भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट संदर्भात गांगुलीने केली भविष्यवाणी
भारत आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिली टेस्ट मॅच कोलकातामध्ये होत असून या मॅच संदर्भात सौरव गांगुलीने एक भविष्यवाणी केली आहे.
कोलकाता : भारत आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिली टेस्ट मॅच कोलकातामध्ये होत असून या मॅच संदर्भात सौरव गांगुलीने एक भविष्यवाणी केली आहे.
कोलकातातील इडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेली मॅच पावसामुळे उशीरा सुरु झाली. पहिल्या दिवशी अवघ्या १७ रन्सवरच टीम इंडियाने तीन विकेट्स गमावले.
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट मॅच संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. गुरुवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गांगुली उपस्थित होता. त्यावेळी गांगुलीने भारत-श्रीलंका मॅचसंदर्भात वक्तव्य केलं आहे.
सौरव गांगुलीला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गांगुलीने म्हटलं की, मी तुम्हाला एक सांगतो जरी भारतीय टीमने १७ रन्सवर तीन विकेट्स गमावले असतील तरी ही टेस्ट मॅच भारतच जिंकेल.
ज्यावेळी गांगुलीला हा प्रश्न विचारला त्यावेळी टीम इंडियाचा स्कोर १७ रन्सवर तीन विकेट्स असा होता. तर आता दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्कोर ७४ रन्स झाला असून पाच विकेट्स गमावावे लागले आहेत.
कोलकातामध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे. दुसऱ्या दिवशी लंचपूर्वी पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने मॅच थांबवावी लागली.