IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंकेचे `हे` खेळाडू ठरू शकतात घातक, जाणून घ्या
IND vs SL :टीम इंडिया आणि श्रीलंकेत 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडियाला श्रीलंकेचे हे चार खेळाडू खुप महागात ठरू शकतात.
IND vs SL 1st T20: टीम इंडिया उद्या 3 जानेवारी मंगळवारपासून हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेपुर्वी हार्दिक पंड्याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत त्याने या मालिकेसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. या टी20 मालिकेत श्रीलंकेचे 'हे' 4 खेळाडू टीम इंडियासाठी घातक ठरू शकतात. हे खेळाडू कोण आहेत, हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया आणि श्रीलंकेत 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडियाला श्रीलंकेचे हे चार खेळाडू खुप महागात ठरू शकतात. श्रीलंकेचा अविष्का फर्नांडो, सदीरा समविक्रमा, नुआन तुषारात आणि कसून राजिता हे खेळाडू टीम इंडियाकडून विजय हिरावू शकतात. श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोने (Avishka Fernando) नुकत्याच झालेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. अविष्काने LPL 2022 मध्ये सर्वाधिक धावा केल्या.त्याच्याशिवाय सदीरा समविक्रमानेही बॅटने अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे हे खेळाडू टीम इंडियासाठी घातक आहेत.
हे ही वाचा : ऋषभ पंत बाबत हार्दिक पंड्याच मोठं विधान, म्हणाला...
अविष्का फर्नांडो
श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडो (Avishka Fernando) लंका प्रीमियर लीग 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या खेळाडूने 10 सामन्यात 339 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 षटकार आणि 37 चौकार निघाले.अविष्काने 3 अर्धशतकेही झळकावली आणि त्याचा संघ जाफना किंग्ज चॅम्पियनही झाला.
हे ही वाचा : हार्दिक पंड्याने सांगितला टीम इंडियाच्या नवीन वर्षाचा संकल्प
सदीरा समविक्रमाने
सदीरा समविक्रमाने लंका प्रीमियर लीगमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. जाफना किंग्जकडून खेळताना या खेळाडूने 58 पेक्षा जास्त सरासरीने 294 धावा केल्या. हा खेळाडू टीम इंडियाच्या गोलंदाजांना आव्हान देऊ शकतो.
नुआन तुषारात
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुआन तुषारामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांना अडचणीत आणण्याची ताकद आहे. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने लंका प्रीमियर लीगमध्ये 9 सामन्यांत 14 बळी घेतले. लीगमध्ये तो श्रीलंकेचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
कसून राजिता
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज कसून राजिताही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या खेळाडूने 8 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. रजिताचा इकॉनॉमी रेटही जबरदस्त राहिला आहे. त्याने एका षटकात फक्त 6.30 धावा दिल्या.
दरम्यान श्रीलंकेला हलक्यात घेण टीम इंडियाला महागात पडू शकते. कारण श्रीलंकेचे हे चार खेळाडू टीम इंडियासाठी घातक ठरू शकतात. आता हे खेळाडू टीम इंडियाला पराभवाचे पाणी पाजतात की, टीम इंडिया त्यांचा पराभव करते, हे पाहावे लागणार आहे.