IND Vs SL T20: श्रीलंका आणि भारतादरम्यानच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारताने 43 धावांनी दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेच्या भूमीवर मिळवलेल्या सर्वात मोठ्या विजयामध्ये भारताच्या फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. भारताने दिलेलं 214 धावांचं आव्हान श्रीलंकन संघाला पेलवलं नाही. भारतीय संघाने सामना जिंकला असला तरी या सामन्यात भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोईला मोठी दुखापत झाली आहे. सामना सुरु असताना फलंदाजाने सरळ मारलेला एक चेंडू त्याच्या डोळ्याच्या अगदी खाली गालावर लागला. काही समजण्याच्या आताच चेंडू चेहऱ्यावर लागल्याने बिश्रोई थोडा गोंदळून गेला. हा चेंडू एवढ्या जोरात लागला की बिश्नोईच्या गालाजवळून भळाभळा रक्त वाहू लागलं. 


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, रवी बिश्नोईने श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना सामन्यातील 16 वी ओव्हर टाकली. श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस फलंदाजी करत होता. बिश्नोईने गुगली टाकला. पुढे येऊन बॉल टोलवण्याच्या नादात बॉलने बॅटची कड घेतली आणि तो थेट बिश्नोईच्या दिशेने गेला. बॅटची कडच लागल्याने चेंडू एवढ्या वेगात नसेल असा विचार करत बिश्रोईने कामिंदूला कॉट अॅण्ड बोल्ड करण्याच्या हेतूने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. यासाठी बिश्रोईने आपल्या उजव्या बाजूला डाईव्ह टाकली. बिश्नोईने यापूर्वी अशापद्धतीने अनेक फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडवलं असून तंबूचा रस्ता दाखवला आहे. यावेळीही बिश्नोईने असा प्रयत्न केला पण त्यात तो जखमी झाला.


स्पेल संपवताना केला चमत्कार


रिफ्लेक्शन टाइम अगदीच कमी असल्याने कॅच पकडण्यासाठी बिश्नोईने बॉल समोर हात तर घातला मात्र एका हाताने त्याला बॉल पकडता आला नाही. या प्रयत्नामध्ये बिश्रोईचा तोल गेला आणि तो पिचवर पडला. मात्र बॉल जमीनीवर पडून पुन्हा बाऊन्स होत बिश्नोईच्या गालाला लागला. सुदैवाने त्याचा उजवा डोळा थोडक्यात बचावला. हे सारं इतक्या पटकन् घडलं की आपल्या गालातून रक्त येऊ लागलं आहे हे उमगण्यासाठी बिश्रोईला काही क्षणांचा वेळ घ्यावा लागला. हा बॉल बिश्नोईला एवढ्या जोरात लागला की ज्याच्या त्वचेला एक कट गेला. त्यामधून रक्तही येऊ लागलं. संघाच्या फिजिओंनी मैदानात घाव घेतली. त्यांनी या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र ओव्हरच्या पहिल्या बॉलवरच रक्तबंबाळ झाल्यानंतरही बिश्नोईने मैदान न सोडता गोलंदाजी करत मैदानात राहण्याचा निर्णय घेतला. याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बिश्नोईने श्रीलंकन कर्णधार चरित असलंकाची विकेट घेतल्याने श्रीलंकेच्या विजयाच्या आशा अधिक कमी झाल्या. 


1)



2)



3)



अनेकांना आठवला कुंबळे


जखमी अवस्थेतील बिश्रोईला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना अनिल कुंबळे आठवला. कुंबळेनेही अनुवटीला दुखापत झाल्यानंतर बॅण्डएड लावून गोलंदाजी केली होती.