मुंबई : टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका (Sri Lanka Tour Of India 2022) खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे. स्टार गोलंदाजाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला या मालिकेला मुकावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे.  (ind vs sl t20 series team india star bowler deepak chahar ruled out due to injurey)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया 24 फेब्रुवारीला श्रीलंका विरुद्ध पहिली टी 20 मॅच खेळणार आहे. मात्र त्याआधी दीपक  चाहर (Deepak Chahar) संघाबाहेर गेला आहे. दीपकला विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत (IND vs WI T20I Series) मांडीला दुखापत झाली होती. यामुळे दीपकला सामना अर्ध्यात सोडावा लागला होता. आता दुखापतीमुळे त्याला मालिकेला मुकावं लागलं आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत अजूनबी कोणती दिलेली नाही.


 दरम्यान आता  दीपक आपल्या दुखापतीवर बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मेहनत घेणार आहे. दीपकला या दुखापतीतून सावरण्यासाठी 5-6 आठवड्यांचा वेळ लागू शकतो.  


आयपीएलमध्ये खेळणार की मुकणार? 


श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. यानंतर आयपीएलच्या 15 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. दीपक चाहरला चेन्नईने 14 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे आता दीपक आयपीएलपर्यंत या दुखापतीतून उभारणार का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.   


टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.