मुंबई : श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) कोणाला खेळवणार, असा प्रश्न सातत्याने केला जात आहे. मात्र पुजारा-रहाणेची जागा घेण्यासाठी टीम इंडियामध्ये 3 प्रबळ दावेदार आहे. यामुळे आता रोहितला या 3 पैकी कोणत्या दोघांना संधी द्यायची आणि उर्वरित कोणत्या एक खेळाडूला बाहेर बसवायचं, असा मोठा पेच निर्माण झाला आहे. (ind vs sl test series 2022 captain rohit sharma might give chance to shubaman gill and shreyas iyer in 1st test and may hanuma vihari dropped)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांना संधी मिळण्याची शक्यता 


श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) श्रीलंका विरुद्दच्या टी 20 मालिकेत शानदार कामगिरी केली. श्रेयसने या मालिकेत 204 धावा कुटल्या. श्रेयस सातत्याने धमाकेदार खेळी करतोय. श्रेयसने कसोटी पदार्पणात शतकी खेळी केली होती. त्यामुळे श्रेयस रहाणेच्या जागी मधल्या फळीतील जागेसाठी प्रबळ दावेदार आहे.


पुजाराच्या जागी कोणाला संधी?  


रोहित शर्मा चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) जागी युवा शुबमन गिल (Shubaman Gill) याला संधी देऊ शकतो. शुबमनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. शुबमन आयपीएलमध्येही धमाकेदार कामगिरी केली.  त्यामुळे रोहित शुबमनला पुजाराच्या जागी स्थान देऊ शकतो.         


दोघांना संधी मग बाहेर कोण बसणार?


रोहित तिसऱ्या आणि पाचव्या ठिकाणी शुबमन आणि श्रेयसला उतरवू शकतो. त्यामुळे हनुमा विहारीला (Hanuma Vihari) बाहेर बसावं लागू शकतो. मात्र प्लेइंग इलेव्हनबाबत अजूनही चर्चाच सुरु आहेत. यामुळे ऐनवेळेस काहीही बदल होऊ शकतो. मात्र 3 जणांपैकी कोणत्या दोघांची निवड करायची हा पेच रोहितसमोर असणार आहे.               


श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.