मुंबई : रोहित शर्माने  (Rohit Sharma) कॅप्टन झाल्यापासून अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. रोहित युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. मात्र एक असा खेळाडू आहे, ज्याला माजी कर्णधार विराट कोहलीनंतर रोहित शर्माही संधी न देण्याच्या मानसिकतेत आहे. रोहित शर्माने या खेळाडूला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीममधून बाहेर केलं आहे. त्यामुळे जर खेळवायचंच नाही, तर मग निवडच का करता, असा संतप्त सवाल हा क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे. (ind vs sl test series 2nd test team india relesed to kuldeep yadav he not get chance in playing eleven) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप यादवला बाहेरचा रस्ता


कॅप्टन रोहित शर्माने चायनामॅन बॉलर कुलदीप यादवला (Kuldeep Yadav)  संघातून वगळलं आहे. रोहितने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतही कुलदीपला संधी दिली नव्हती.


कुलदीपला वेस्टइंडिज आणि श्रीलंका विरुद्धच्या सीरिजमध्येही खेळवलं नाही. त्यामुळे रोहितही विराट कोहलीचाच कित्ता गिरवतोय का, असाच प्रश्न हा क्रिकेट चाहत्यांना पडलाय.


अक्षर पटेल दुखापतीतून सावरल्याने त्याचं टीममध्ये कमबॅक झालंय. यामुळे कुलदीपला संघातून वगळण्यात आलं. रोहितने कुलदीपला श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीतही खेळवलं नाही. त्यामुळे कुलदीपला एकही सामना न खेळता संघाबाहेर बसावं लागलंय.  


त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वात कुलदीपच्या कारकिर्दीला लागलेला ब्रेक हा रोहितच्या कॅप्टन्सीत तसाच कायम राहणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.      


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणिअक्षर पटेल.