Ind vs SL Test Series | टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूचं कमबॅक, तर हा खेळाडू संघाबाहेर
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील (IND vs SL Test Series 2022) दुसरा आणि शेवटचा सामना हा 12-16 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील (IND vs SL Test Series 2022) दुसरा आणि शेवटचा सामना हा 12-16 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये (M Chinnaswamy Stadium Bengaluru) करण्यात आलं आहे. या सामन्याआधी टीम इंडियासाठी (Team India) मोठी गूड न्यूज आहे. टीम इंडियाच्या बॉलिंग ऑलराऊंडरचं संघात पुनरागमन झालंय. मात्र दुसऱ्या बाजूला स्टार खेळाडूला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आलंय. (ind vs sl test series spinner axar patel added in team india squad for 2nd test against sri lanka and kuldeep yadav released)
बॉलिंग ऑलराऊंडर अक्षर पटेलचं (Axar Patel) टीममध्ये कमबॅक झालंय, तर दुसऱ्या बाजूला चायनामॅन बॉलर (Chinaman Bowler) कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघातून वगळण्यात आलंय. बीसीसीआयने (Bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
अक्षर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती. मात्र आता अक्षर दुखापतीतून सावरल्याने त्याचं संघात पुनरागमन झालंय. तर कुलदीपला नेहमी प्रमाणे संघाबाहेर बसावं लागलंय.
अक्षरने बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या दुखापतीवर मेहनत घेतली. अक्षर कठोर मेहनतीनंतर दुखापतीतून सावरला. अक्षर आता पूर्णपणे फिट असल्याचं बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने सांगितलंय.
टीम इंडियाने या कसोटी मालिकेची विजयी सुरुवात केलीय. त्यामुळे टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया दुसऱ्या सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका भारतात पहिला कसोटी विजयासाठी जोरदार प्रयत्न करेल.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ( अक्षर पटेल.