Rohit Sharma | कॅप्टन होताच रोहित शर्माचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?
टीम इंडिया श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी (IND vs SL Test Series 2022) सज्ज आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यापासूनच टीम इंडियाचा 35 वा कर्णधार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.
मुंबई : टीम इंडिया श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी (IND vs SL Test Series 2022) सज्ज आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यापासूनच टीम इंडियाचा 35 वा कर्णधार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा सामना असणार आहे. या सामन्याच्या एक दिवसाआधी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत कॅप्टन रोहितने विराट कोहलीबाबत (Virat Kohli) वक्तव्य केलं. तसेच विविध विषयांवर रोहितने प्रतिक्रिया दिली. (ind vs sl test series team india captain rohit sharma reaction on virat kohli over to her 100 test match in press conference)
कसोटी क्रिकेटमध्ये 100 वा सामना खेळणं ही अनन्यसाधारण कामगिरी असते. या पार्श्वभूमीवर रोहितने विराटचं भरभरुन कौतुक केलं. तसेच रोहितने विराटसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
रोहित काय म्हणाला?
रोहितने विराटच्या त्या शानदार खेळीची आठवण सर्वांना सांगितली. रोहितने विराटच्या खास क्षणाबाबत प्रतिक्रिया दिली. "विराटने 2013 मध्येदक्षिण आफ्रिका विरुद्ध शतक ठोकलं होतं. ती खेळी माझ्यासाठी खास होती. ती पीचमध्ये बाऊन्स फार होता. तेव्हा आफ्रिकेकडे डेल स्टेन, मॉर्ने मॉर्कल, फिलेंडर आणि जॅक कॅलिससारखे घातक गोलंदाज होते. या गोलंदाजांसमोर विराट शतक ठोकलं. माझ्यासाठी विराटने 2013 मध्ये केलेलं हे शतक माझ्यासाठी खास आहे", असं रोहित म्हणाला.
विराटने तेव्हा जोहान्सबर्गमध्ये झालेल्या त्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 119 धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 96 धावांची खेळी केली होती. विराट आणि रोहितसाठी दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच दौरा होता.
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.