IND vs SL: कॅप्टन पांड्या खेळणार की नाही? दुखापतीवर मोठी अपडेट समोर, हार्दिक म्हणतो...
Hardik Pandya: पहिल्या सामन्यात विजयी गुलाल उधळल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात (IND vs SL, 2nd T20I) चांगली कामगिरी करून मालिका खिश्यात घालण्याची तयारी टीम इंडिया करत आहे. मात्र...
IND vs SL, 2nd T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या रोमांचक टी-ट्वेंटी सामन्यात (1st T20I) भारताने श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव केला. पहिल्या सामन्यात विजय नोंदवल्यानंतर भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. पहिल्या सामन्यात शिवम मावी (Shivam Mavi) आणि उमरान मलिक (Umran Malik) या बॉलर्सच्या भेदक गोलंदाजीची कमाल पहायला मिळाली. कॅप्टन हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) गोलंदाजीची सुरूवात करत सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. मात्र, आता टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढलं आहे. (IND vs SL Will Captain Hardik Pandya play or not in 2nd T20I Big update on injury ahead marathi sports news)
पहिल्या सामन्यात विजयी गुलाल उधळल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात (IND vs SL 2nd T20I) चांगली कामगिरी करून मालिका खिश्यात घालण्याची तयारी टीम इंडिया करत आहे. मात्र, आता टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Captain Hardik Pandya) खेळणार की नाही? यावर सस्पेन्स कायम असल्याचं पहायला मिळतंय. भानुका राजपक्षेचा कॅच पकडताना हार्दिक पांड्याचा पाय मुरगळला (Hardik Pandya's leg sprained) होता. त्यानंतर सुर्यकुमारने जबाबदारी खांद्यावर घेतली होती.
सामन्याच्या 15 ओव्हरमध्ये हार्दिकने पुन्हा मैदानात कमबॅक केलं होतं. अखेरची ओव्हर हार्दिक करेल, अशी अपेक्षा असताना अक्षरकडे (Axar Patel) बॉल सोपवण्यात आला होता. त्यामुळे हार्दिकची दुखापत गंभीर (Hardik Pandya's injury) असल्याचं जाणवत होतं. अशातच आता हार्दिकने त्याच्या दुखापतीवर वक्तव्य केलंय.
काय म्हणाला हार्दिक ?
माझा पाय मुरगळला होता, परंतु आता मी ठीक आहे. दुखापत गंभीर नाही, त्यामुळे मी हसतोय याचा अर्थ सर्वकाही ठीक आहे असं समजा, असं हार्दिक पांड्या (Hardik Pandya on injury) म्हणालाय.
दरम्यान, अखेरच्या बॉलपर्यंत कडवी झुंज देत श्रीलंकेने भारताच्या विजयाची वाट रोखून धरली होती. अखेरच्या ओव्हरला 13 धावांची गरज असताना अक्षर पटेलने डावपेच खेळले आणि अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने विजय नोंदवला. त्यामुळे आता पुण्यात होणाऱ्या (2nd T20 Pune) आगामी सामन्यात यंगिस्तान कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.