मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय क्रकिेट संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. 17 डिसेंबर ते 26 जानेवारीदरम्यान जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, पर्ल आणि केपटाऊनमध्ये सामने खेळणार आहे. पण या दौऱ्यावर कोरोनाचं सावट पसरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे हा दौरा होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेवर नव्या व्हेरिएंटचं सावट
दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटची आतापर्यंत 30 प्रकरणं समोर आली आहेत. या व्हेरिएंटला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे. या व्हेरिएंटचा परिणाम भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या क्रिकेट मालिकेवरही होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संग 3 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 4 टी20 सामने खेळणार आहे.


नवा व्हेरिएंट जास्त धोकादायक
नवीन 'B.1.1.529' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये सापडला आहे. सतत म्यूटेशन होत असलेल्या या व्हेरिएंटमुळे WHO सोबतच शास्त्रज्ज्ञही धास्तावले आहेत. हा नवीन व्हेरिएंट डेल्टा पेक्षा जास्त धोकादायक आहे आणि त्यापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.


भारतीय-अ संघ दक्षिण आफ्रिकेत
भारतीय अ क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका अ संघाबरोबर ब्लोमफोंटेमध्ये तीन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. 


गुआटेंगमध्ये सर्वात जास्त प्रकरणं
भारतीय क्रिकेट संघाचा एक सामना जोहान्सबर्गमध्ये खेळला जाणार आहे. गुआटेंग प्रांतातील सर्वात मोठं शहर आहे. गुआटेंगमध्ये नव्या व्हेरिएंटची सर्वात जास्त प्रकरणं सापडली आहेत. नोव्हेंबरमध्ये नव्या व्हेरिएंटमुळे गुआटेंगमध्ये सर्वाधिक तरुण वर्ग प्रभावित झाला आहे. अशात ही मालिका खेळवावी का असा प्रश्न उपस्तित करण्यात येत आहे. 


भारतात नव्या व्हेरिएंटचं प्रकरण नाही
सध्या भारतात नव्या व्हेरिएंटचं एकही प्रकरण सापडलेलं नाही. तज्ज्ञांच्या मते कोरोनाचे असे अनेक नवनवे व्हेरिएंट येत जातील पण यामुळे घाबरण्याचं कारण नाही. पण खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. 


भारताचं दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक


17 डिसेंबर पहिला कसोटी सामना -  जोहान्सबर्ग


26 डिसेंबर दुसरा कसोटी सामना - सेंच्युरियन


3 जानेवारी तिसरा कसोटी सामना - केप टाऊन


11 जानेवारी पहिला एकदिवसीय सामना - पार्ल


14 जानेवारी दुसरा एकदिवसीय सामना - केप टाऊन


16 जानेवारी तिसरा एकदिवसीय सामना - केप टाऊन


19 जानेवारी, 21 जानेवारी, 23 जानेवारी, 26 जानेवारी - टी 20 सामने