मुंबई: इंग्लंड विरुद्ध वन डे सामन्या दरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. 8 एप्रिलला सर्जरी झाली आता या सर्वातून श्रेयस अय्यर हळूहळू सावरत आहे. नुकताच त्याने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. पण श्रेयस अय्यर श्रीलंका दौऱ्यापर्यंत पूर्ण फीट होईल की नाही याबाबत अद्यापही शंका आहे. त्यामुळे तो श्रीलंके विरुद्ध टीम इंडिया B मधून खेळण्याची शक्यता धूसर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यर ऐवजी संघात कोणाल संधी मिळणार याची चर्चा आहे. तीन खेळाडूंमध्ये सध्या चुरस पाहायला मिळत आहे. संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या तिघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. 


ईशान किशन- IPL 2021 मध्ये झालेल्या 21 सामन्यांमध्ये ईशान किशनचा परफॉरमन्स विशेष राहिलेला नाही. पण श्रीलंका दौऱ्यात जर निवड झाली तर त्याला एक नवीन संधी मिळू शकते. आपली उत्तम कामगिरी दाखवण्यासाठी ही संधी त्याला मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शोएब अख्तरच्या धमकीनं घाबरला हा भारतीय फलंदाज, भीतीमुळे खेळाला नाही आपला फेवरेट शॉट


संजू सॅमसान- संजू सॅमसनचा IPL 2021मध्ये दोन सामने उत्तम खेळला होता मात्र बाकी सामने फ्लॉप ठरला होता. त्यालाही श्रीलंका सामन्यादरम्यान संधी दिली जाण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनला जर संधी मिळाली तर त्याचासाठी हा सुवर्ण चान्स ठरेल. 


सुर्यकुमार यादव- सुर्यकुमार यादव सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याला देखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे.


जुलै महिन्यात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी BCCIचं प्लॅनिंग सुरू आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या, शिखर धवन सीनियर प्लेअर असणार आहेत. विराट आणि रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सीरिजसाठी बिझी असल्यानं टीम Bची कमान कोणाच्या खांद्यावर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.