मुंबई : टीम इंडियाविरूद्द दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आहे. वेस्ट इंडिजने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रथम फलंदाजी करून वेस्ट इंडिज किती धावांचा डोंगर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज दुसरा सामना आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका काबीज करण्याची सुवर्णसंधी आहे.


'या' युवा खेळाडूचं पदार्पण 
वेस्ट इंडिज विरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात आवेश खानला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आवेशच वनडेत पदार्पण करणार आहे. आवेशचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा पहिलाच सामना असणार आहे.


टीम इंडियाने पहिला वन डे सामना अवघ्या 3 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या वन डे सामना जिंकन मालिका खिशात घालण्याचा विचाराने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तर पराभवाचा वचपा काढण्यासाठी वेस्ट इंडिज सज्ज आहे.


टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :  शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, आवेश खान.


वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन: शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शामराह ब्रूक्स, काइल मेयर्स, निकोलस पूरन (क), रोव्हमन पॉवेल, अकील होसेन, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स, हेडन वॉल्श.