कोलकाता : टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या टी 20 सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने विंडिजला क्लीन स्वीप दिला आहे. टीम इंडियाने 3-0 अशा एकतर्फी फरकाने ही मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी 185 धावांचे आव्हान दिले होते. मात्र विंडिजला निर्धारित  20 ओव्हरमध्ये  9  विकेट्स गमावून 167 धावा करता आल्या. (ind vs wi 3rd t20i team india beat west indies by 17 runs and win series at eden garden kolkata)    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंडिजकडून कर्णधार निकोलस पूरने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. मात्र या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मोठा आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहर, व्यंकटेश अय्यर आणि शार्दुल ठाकूर या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.


वनडेनंतर आता टी 20 मध्ये क्लीन स्वीप  


दरम्यान या विजयासह टीम इंडियाने वनडे पाठोपाठ विंडिजला टी 20 सीरिजमध्येही क्लीन स्वीप दिला आहे. टीम इंडियाने नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई आणि आवेश खान. 


वेस्टइंडिज प्लेइंग इलेव्हन :  कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कॅप्टन), जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रेक्स, फॅबियन ऍलन आणि हेडन वॉल्श.