मुंबई : वेगवान गोलंदाज आवेश खानने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात डेब्यू केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याची संधी रोहित शर्माने दिली आहे. कोलकाता इथे ईडन गार्डनवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात आवेशला पदार्पणाची संधी मिळाली. आवेशचं पदार्पण आणि टीम इंडियाचा विजय हा सुवर्ण योग अखेर जुळून आलाच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवेशला पदार्पणासाठीची कॅप अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दिली. आवेश खानच्या चेहऱ्यावरचे भाव यावेळी पाहण्यासारखे होते. रोहित शर्माने खूप जास्त सपोर्ट केला असं आवेश खाननं यावेळी सांगितलं. BCCI ने आपल्या ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये व्यंकटेश अय्यर आणि आवेश खान एकमेकांशी बोलत आहे. 


'प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं टीम इंडियामध्ये खेळण्याचं ती संधी मला मिळाली. आज माझं स्वप्न पूर्ण झालं यासाठी मला रोहितने खूप जास्त सपोर्ट केला. मी माझ्यापरीनं खूप चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन', असंही आवेश खान यावेळी म्हणाला आहे. 


आवेश खानला डेब्यू सामन्यात एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. तिसऱ्या टी 20 सामन्यात शार्दुल ठाकुर, वेंकटेश अय्यर आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या आहेत. 


टीम इंडियाने टी 20 सीरिजमध्ये 3-0 ने विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिज संघ पराभूत झाल्यानंतर नाराज झाला. त्यांनी पटापट बॅग भरून आपल्या घरचा रस्ता धरला आहे. सध्या टी 20 वर्ल्डकप लक्षात घेऊन टीम इंडियाची बांधणी करण्याकडे कर्णधार रोहित शर्माचा कल आहे.