मुंबई : टीम इंडियाने गेल्या 16 वर्षांपासून वनडे क्रिकेटमध्ये एकही वनडे सीरिज गमावली नाही. सध्याच्या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन वेस्ट इंडिजविरुद्ध क्लीन स्वीप करण्यासाठी मोठा बदल करू शकतो. धवन स्टार खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या वन डे सामन्यात शुभमन गिल आणि शिखर धवन ओपनिंग जोडी पाहायला मिळू शकते. दुसऱ्या सामन्यात गिलने 43 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर उतरण्याची शक्यता आहे. अय्यर तिसऱ्या क्रमांकावर उतरुन  उत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे टीम इंडियातील विराटची जागा भविष्यात धोक्यात देखील येऊ शकते अशी चर्चा आहे. 


शिखर धवन चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी देईल. पाचव्या नंबरवर ईशान किशन आणि त्यानंतर संजू सॅमसन खेळेल अशी चर्चा आहे. ईशानचं विकेटकीपिंग स्कील खूप उत्तम आहे. सहाव्या नंबरसाठी दीपक हुड्डाला ठेवलं जाऊ शकतं. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. 


हे खेळाडू टीममधून होऊ शकतात आऊट


आवेश खानची कामगिरी अत्यंत वाईट आहे. त्याला एकही विकेट घेता आली नाही. आता कॅप्टन गब्बर अर्शदीपला संधी देऊ शकतो. मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकुर उतरणार हे नक्की आहे. युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलला देखील संधी मिळणार आहे. 


टीम इंडिया संभाव्य प्लेइंग लेव्हन: 


शिखर धवन (कर्णधार) शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्याकुमार यादव, ईशान किशन, दीपक हुड्डा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल