मुंबई : टीम इंडियाने अलीकडेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला. भारतीय संघाला आता आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला हरवायचे आहे. मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि त्याच्या संघाला नव्या उपकर्णधाराची गरज भासणार आहे. कारण केएल राहुल दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत या २४ वर्षीय खेळाडूचे नशीब उघडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलच्या जागी हा खेळाडू नवा उपकर्णधार


केएल राहुलच्या दुखापतीनंतर नवा उपकर्णधार कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पद सांभाळण्यासाठी रोहित शर्माकडे आधीच एक खेळाडू आहे. होय, या खेळाडूचे नाव आहे ऋषभ पंत. हा 24 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज राहुलच्या जागी टीम इंडियाचा नवा यष्टिरक्षक असेल. पंतला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत तो या पदाचा सर्वात मोठा दावेदार असेल. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गेल्या वर्षी अप्रतिम कामगिरी केलीये.


राहुल आणि अक्षर बाद


अलीकडेच, BCCI ने घोषित केले आहे की उपकर्णधार KL राहुल आणि स्टार अष्टपैलू अक्षर पटेल यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून वगळण्यात आले आहे. रोहित शर्मासाठी हा मोठा धक्का आहे कारण राहुल हा संघाचा सर्वात मजबूत फलंदाज आहे आणि रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलसारखा अष्टपैलू खेळाडू टीम इंडियासाठी खूप प्रभावी ठरू शकला असता. मात्र आता हे दोन्ही खेळाडू या मालिकेतून बाहेर झाले आहेत.


दोन खेळाडूंची संघात एंट्री


अक्षर पटेल आणि केएल राहुलला वगळल्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. मात्र त्यांच्या जागी बीसीसीआयने आणखी दोन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. निवडकर्त्यांनी राहुल आणि अक्षर यांच्याऐवजी दीपक हुडा आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश केला आहे. गायकवाडला राहुलच्या अनुपस्थितीत त्यांचे स्थान पक्के करण्याची ही उत्तम संधी असेल. या खेळाडूला जास्त संधी मिळालेल्या नाहीत. दुसरीकडे, दीपक हुडाने वनडे मालिकेत केलेल्या चांगल्या कामगिरीचे फळ मिळाले.


भारताचा T20 संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा.