IND vs WI: कसोटी मालिका जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) एकदिवसीय मालिकाही जिंकण्याच्या हेतूने भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. पण पहिल्या सामन्याआधीच भारतीय संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. कसोटी मालिकेत जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजला संघातून वगळण्यात आलं आहे. मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) तिन्ही एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. 


विश्रांती देण्याचं कारण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिजविरोधीत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचा उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या घोट्याला दुखापत झाली आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. 



दरम्यान, आज होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मोहम्मद सिराजच्या जागी अद्याप कोण खेळेल याची माहिती देण्यात आलेली नाही. संघाने अद्याप तरी बदली खेळाडूला बोलावलेलं आहे. 


विराट आणि रोहितला रेकॉर्ड करण्याची संधी 


पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वांचं लक्ष भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या कामगिरीकडे असणार आहे. किंग्स्टन ओव्हल मैदानात हा सामना होणार असून भारतीय स्टाऱ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठे रेकॉर्ड रचण्याची शक्यता आहे. 


विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 102 धावांची गरज आहे. दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही आज आपल्या नावे नवा विक्रम रचण्याची संधी आहे. रोहितला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 175 धावांची गरज आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करण्याचा भीमपराक्रम याआधी केला आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यातच हा रेकॉर्ड पूर्ण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


वेस्ट इंडिज संघ: 


शाई होप (w/c), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, शिमरॉन हेटमायर, अॅलिक अथनाझ, रोव्हमन पॉवेल, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, ओशाने थॉमस, जयडेन सील्स, केविन सिंक्लेअर, डॉमिनिक ड्रेक्स, यॅनिक


भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (w), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर , अक्षर पटेल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड