मुंबई : रोहित शर्मानंतर टीम इंडियाचं नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू असताना आता एका दिग्गज क्रिकेटरने भाविष्यवाणी केली आहे. या भविष्यवाणीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. न्यूझीलंडचा माजी स्टार खेळाडू स्कॉट स्टायरिसने एक मोठी भविष्यवाणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्या किंवा के एल राहुलकडे जाईल अशी चर्चा असताना आता या दिग्गजने केलेल्या भविष्यवाणीमुळे खळबळ उडाली आहे. त्याने म्हटलं की श्रेयस अय्यर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार असेल. 


रोहितनंतर श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात येईल अशी भविष्यवाणी स्कॉट स्टायरिसने केली आहे. यावेळी त्याने श्रेयस अय्यरच्या क्षमतेबाबतही चर्चा केली. 


श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाचे सगळे गुण आहेत. त्याचे गुण मला फार आवडतात. त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य आहे हे आपण आयपीएलमध्ये देखील पाहिलं असेल. तो टीम इंडियाचा पुढचा कर्णधार बनू शकतो अशी खूप जास्त संभावना आहे. त्यामुळे अय्यरला जास्त संधी द्यायला हवी. 


श्रेयस अय्यरला जर यश मिळालं नाही तर मग दुसरा पर्याय निवडण्याची गरज आहे. मात्र तशी वेळ येणार नाही असा विश्वास न्यूझीलंडच्या खेळाडूनं व्यक्त केला आहे. श्रेयस अय्यर मिळालेल्या संधीचं सोनंच करेल, तो खूप प्रतिभावानं आहे असं दिग्गज क्रिकेटर म्हणाला. 


वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे सीरिजवर स्टायरिसने आपले मत व्यक्त केले.  त्याच्या म्हणण्यानुसार अनेक नवीन खेळाडूंना संधी देणं गरजेचं आहे. तर खेळाडूंना आरामही देणं गरजेचं आहे. त्यामुळे सीनियर खेळाडू वेगवेगळ्या गोष्टी करू शकतात. त्यांना दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी वेळही मिळू शकतो. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये योग्य खेळाडूंना संधीही मिळू शकते