कोलकाता : भारत-वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, रोहित शर्माचा क्लास पुन्हा एकदा दिसून आला. डीआरएसच्या बाबतीत रोहितचा निर्णय पुन्हा एकदा योग्य ठरला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. पण, मधल्या फळीतील फलंदाजांनी शेवटच्या 5 षटकांत चांगली खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरच्या धडाकेबाज खेळीसमोर कॅरेबियन गोलंदाजांची दमछाक झाली. त्याचवेळी रोहित शर्माच्या डीआरएसनेही चाहत्यांची मने जिंकली.


वेस्ट इंडिजसमोर प्रथम फलंदाजी करताना भारताने 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कॅरेबियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पॉवरप्लेमध्येच संघाने आपले दोन महत्त्वाचे विकेट गमावले. भारतीय संघ गोलंदाजी करायला उतरला तेव्हा पहिल्याच षटकात डीआरएसचा मोठा ड्रामा झाला.



वास्तविक, असे घडले की दीपक चहरच्या पहिल्याच षटकात अंपायरने काइल मेयर्सला एलबीडब्ल्यू घोषित केले. पण, मेयर्सने वेळ न घालवता लगेच रिव्ह्यूकडे बोट दाखवले आणि मैदानावरील अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. कारण चेंडू स्टंपवरून जात होता. अशा परिस्थितीत रोहित शर्माचा संघ निराश होताना दिसला.


हिटमॅन रिव्ह्यू योग्य ठरला


यानंतर, पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर मेयर्सच्या बॅटची धार घेताना चेंडू इशान किशनच्या ग्लोव्हजमध्ये अडकला. पण, यावेळी मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद दिले. मग भारतीय कर्णधार हिटमॅनने एकही सेकंद न गमावता रिव्ह्यू घेतला. त्याचा हा रिव्ह्यू योग्य ठरला आणि 6 धावांवर खेळणाऱ्या काइल मेयर्सला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.


बातमी : Pakistan मध्ये झळकले Virat चे पोस्टर, पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोहलीची क्रेझ


रोहित शर्माचा रिव्ह्यू योग्य असल्याचे सिद्ध झाल्यावर मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि मेयर्सला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाने टी20 मालिका 3-0 ने जिंकली.