IND vs WI : अर्धशतक ठोकताच सूर्यकुमार यादवने कोणाला केला नमस्कार?
सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिज विरुद्ध जबरदस्त खेळी केली. त्याने केलेली फटकेबाजी पाहण्यासारखीच होती. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने जेव्हा आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तेव्हा त्याने नमस्कार करुन एका वेगळ्या अंदाजात सेलिब्रेशन केलं.
कोलकाता : भारतीय संघाचा घातक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने भारत आणि वेस्टइंडि विरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये शानदार कामगिरी करत सर्वांचं मन जिंकलं. अडचणीच्या परिस्थितीत सूर्यकुमार यादवने भारतासाठी रन केले. भारतीय संघात त्याने आता आपलं स्थान पक्क केलं आहे.
सूर्यकुमारने विंडिज विरुद्ध 209 च्या रनरेटने 31 बॉलमध्ये 65 रनची जबरदस्त खेळी केली. तिसऱ्या सामन्यात मैदानावर त्याने केलेली फटकेबाजी पाहण्यासारखीच होती. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने जेव्हा आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तेव्हा त्याने नमस्कार करुन एका वेगळ्या अंदाजात सेलिब्रेशन केलं.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने 65 धावांची खेळी केली. त्याने त्याच्या खेळीने तो संघासाठी आता काय करु शकतो. याची झलक देखील दाखवली आणि त्याचं महत्त्व ही दाखवलं.
शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिक्स मारत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने यानंतर नमस्कार करुन अभिवादन स्वीकार केलं. हे पाहून कर्णधार रोहित शर्मा देखील टाळ्या वाजवायला लागला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.