IND vs WI | टीम इंडियाला मोठा धक्का, टी 20 सीरिजमधून 2 स्टार खेळाडू बाहेर
वेस्टइंडिज (West Indies) विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी (T 20 Series) टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचं यानंतर आता टी 20 सीरिजकडे लक्ष आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे दोन खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (ind vs wi t 20 series team india k l rahul and axar patel ruled out of series ruturaj and hudda give chance in squad)
उपकर्णधार के एल राहुल (K L Rahul) आणि ऑलराऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) या दोघांना दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे दोघांना मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. आधीच रवींद्र जाडेजा संघात नाही. त्यात अक्षर पटेल नसणार असल्याने टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे.
राहुलला दुखापत तर अक्षरला कोरोना
केएल विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत हॅमस्ट्रिगंचा त्रास झाला होता. तर अक्षरला कोरोना झाला आहे. अक्षर कोरोनातून सावरत आहे. त्यामुळे या दोघांना संघाबाहेर बसावं लागलं आहे.
या दोघांना संधी
केएल आणि अक्षर या दोघांच्या जागी 2 युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टीम मॅनेजमेंटने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि दीपक हुड्डा (Deepak Hudda) या दोघांना संधी दिली आहे. या दोघांना केएल आणि अक्षरच्या अनुपस्थितीत आपली जागी कायम करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे हे दोघे कशी कामगिरी करतात, याकडेही सर्वांचंच लक्ष असणार आहे.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी
टी 20 मालिकेतील तिन्ही सामन्यांचं आयोजन हे कोलकातातील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे.