IND Vs WI: ऋषभ पंतला मिळणार डच्चू? रोहित शर्माचा मोठा निर्णय
असे काही तरूण खेळाडू आहेत ज्यांना अजून या सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अशा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करू शकतो.
मुंबई : भारताने वेस्ट इंडिजविरूद्धची वनडे मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. तर तीन सामन्यांच्या या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जाणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून वेस्ट इंडिजला क्लिन स्विप देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे.
असे काही तरूण खेळाडू आहेत ज्यांना अजून या सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अशा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करू शकतो.
वेस्ट इंडिजविरूद्धच्या दोन सामन्यांमध्ये मोहम्मद सिराज काही खास कामगिरी करू शकला नाही. अशावेळी रोहित आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्समधून खेळणाऱ्या आवेश खानला संधी देऊ शकतो. आवेशने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती.
या विकेटकीपरला मिळणार संधी
गेल्या 2 सामन्यांमध्ये विकेटकीपर ऋषभ पंतला फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या सामन्यात त्याला ओपनिंगला खेळवण्यात आलं असतानाही तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. अशावेळी टीममध्ये इशान किशनला संधी दिली जाऊ शकते.
या गोलंदाजाचा समावेश होणार?
भारताचा गोलंदाज कुलदीप यादव याला बऱ्याच काळानंतर टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर तिसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्मा त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करू शकतो. भारतीय पिचवर स्पिनर्सची मदत मिळते. त्यामुळे कुलदीपचा टीममध्ये समावेश केल्यास फायदा होईल.
टीम इंडियाचं प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर और दीपक हुड्डा.