IND vs WI: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हतबल विराट कोहली संतापला, VIDEO व्हायरल
IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. तर दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) संघ निवडीचं समर्थन केलं आहे. यादरम्यान, हा पराभव किती जिव्हारी लावणारा आहे हे सांगणारा विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) खराब फलंदाजी झाली सांगत फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. तर दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने टीका होत असताना संघ निवडीचं समर्थन केलं आहे. यादरम्यान, हा लाजिरवाणा पराभव किती जिव्हारी लावणारा आहे हे सांगणारा विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. शनिवारी ब्रिजटाउनमधील केंसिंग्टन ओव्हल मैदानात खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने फक्त 181 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजने 35 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली. तरुण आणि कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यासाठी दोघांना संघातून वगळलं आणि त्यांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली. मात्र दोघेही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले.
भारताने 182 धावांचं आव्हान दिल्यानंतर वेस्ट इंडिजने अत्यंत सहजपणे हे टार्गेट पूर्ण केलं. वेस्ट इंडिजने 36.4 ओव्हरमध्येच विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताच्या या पराभवानंतर अनेकांना विश्वास बसत नव्हता. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता. भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून विराट कोहली प्रचंड नाराज झाला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो डोक्याला हात लावत आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही त्यावर व्यक्त होत आहे. यामधील काहींना विराटला विश्रांती नको होती, त्यामुळेच तो नाराज झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे.
राहुल द्रविडकडून समर्थन
दरम्यान पराभवानंतरही राहुल द्रविडने संघ निवडीचं समर्थन केलं आहे. पण चाहत्यांना विराट आणि रोहितला विश्रांती देणं पसंत पडलेलं नाही. वर्ल्डकपआधी असे प्रयोग करणं संघाला नुकसान पोहोचवू शकतं अस मत काहींनी मांडलं आहे.
त्रिनिदाद येथे 1 ऑगस्ट रोजी दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यासाठी एकत्र येतील. दरम्यान तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारत कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. दरम्यान भारताला मालिका जिंकायची असल्याने कोहली आणि रोहितचं संघात पुनरागम होण्याची शक्यता आहे. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात छाप पाडू शकले नसल्याने त्यांना पुन्हा बाहेर बसवलं जाऊ शकतं.