IND vs WI : पुजाराच्या जागी कोणाला संधी? उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केलं स्पष्ट
Ajinkya Rahane Press Conference : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind vs WI Test ) यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) आणि मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे टीममध्ये आता या दोघांची जागा कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय.
Ajinkya Rahane Press Conference : टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind vs WI Test ) यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये हा सामना रंगणार असून प्लेईंग 11 मध्ये नवे चेहरे दिसण्याची शक्यता टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) वर्तवलीये. सामन्यापूर्वी घेण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने ही माहिती दिलीये.
वेस्ट इंडिज दौऱ्याविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) आणि मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे टीममध्ये आता या दोघांची जागा कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय.
टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) याच्या सांगण्यानुसार, पुजाराच्या जागी तरूणांना खेळण्याची ही चांगली संधी आहे. मला माहिती नाही की, तिसऱ्या नंबरवर कोणाला फलंदाजीची संधी मिळेल. मात्र जो खेळाडू या नंबर खेळेल तो चांगली कामगिरी करेल. याशिवाय शमीच्या ( Mohammed Shami ) जागी खेळणाऱ्या खेळाडूला देखील चांगली संधी असणार आहे.
यशस्वीला करणार डेब्यू?
वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal ) डेब्यू करण्याची शक्यता आहे. यावेळी जयस्वालविषयी बोलताना रहाणे म्हणाला की, मी यशस्वीसाठी फार खूश आहे. तो चांगला खेळाडू असून आयपीएलमध्येही त्याने चांगला खेळ केला आहे.
शुभमन गिलला मिळणार संधी
पहिल्या टेस्टपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) प्लेईंग इलेव्हन (Playin XI) बाबत माहिती दिलीय. यावेळी रोहित शर्मा म्हणण्यानुसार, आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दमदार कामगिरी करणारा यशस्वी जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार हे जवळपास निश्चित झालंय. तर सलामीचा शुभमन गिल (Shubman Gil) तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
कशी असेल टीमची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयदेव उनादकट/मुकेश कुमार