IND vs AUS : टीम इंडियाची महिला ब्रिगेड मोडणार 16 वर्षांचा इतिहास? हरमनप्रीतने काढला हुकमी एक्का!
IND vs AUS Women : तिसऱ्या सामन्यात सामन्यात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) मोठा निर्णय घेतला आहे. जखमी स्नेह राणाच्या जागी मन्नत कश्यपची (Mannat Kashyap) निवड केल्याने टीम इंडियाला आणखी बळ मिळणार आहे.
IND W vs AUS W 3rd ODI : इंडियन वुमेन्स टीम आणि ऑस्ट्रेलियन वुमेन्स टीम यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाचा (Indian Womens Team) पराभव करून तगड्या ऑस्ट्रेलियाने मालिकेवर कब्जा केलाय. त्यामुळे आता अखेरच्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया 16 वर्षांचा इतिहास मोडीस काढण्याची तयारी करत आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असणार आहे. तर एलिसा हिली (Alyssa Healy) ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करेल.
टीम इंडिया इतिहास रचणार?
घरच्या मैदानावर खेळताना, 2007 पासून भारताला एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलेलं नाही. हा वाईट विक्रम मोडून 16 वर्षांचा इतिहास बदलण्याच्या इराद्याने टीम इंडियाच्या महिला खेळाडू खेळणार आहे.
यंदाच्या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी तुलनेत चांगली राहिल्याचं पहायला मिळालं. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला होता. त्यानंतर आता वनडे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा माज मोडण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. पहिल्या सामन्यात गोलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीमुळे भारताला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात 3 धावांनी निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं. अशातच आता आजच्या सामनात विजय ऐतिहासिक ठरणार आहे.
टीम इंडियाचा स्कॉड : यास्तिका भाटिया, स्मृति मंधाना, ऋचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), दीप्ति शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्रकार, हरलीन देयोल, श्रेयंका पाटिल, स्नेह राणा, रेनुका सिंह ठाकुर, शैफाली वर्मा, सैका इशाक, टिटास साधु, मन्नत कश्यप.
ऑस्ट्रेलियाचा स्कॉड : फोएबे लिचफील्ड, एलिसा हीली (कॅप्टन), एलिसे पेरी, बेथ मूनी, ताहिला मैकग्रा, एशले गार्डनर, एनाबेल सदरलैंड, जॉर्जिया वेयरहैम, अलाना किंग, किम गार्थ, डार्सी ब्राउन, मेगन शुट्ट, जेस जोनासेन, हीथर ग्राहम.