IND W vs AUS W : हरमनप्रीत कौरने घेतला ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनशी पंगा, LIVE सामन्यात राडा, पाहा काय झालं?
India vs Australia Womens Test : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाची हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) ऑस्ट्रेलियन कॅप्टनशी पंगा घेतल्याचं पहायला मिळालं. नेमकं काय झालं? पाहुया...
Harmanpreet Kaur Angry Video : भारतीय महिला क्रिकेट संघ पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इंग्लंडवर ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर संघ ऑस्ट्रेलियालाही हरवण्यापासून फक्त काही पाऊल लांब आहे. अशातच आता महिला ब्रिगेड काम फत्ते करणार का? असा सवाल विचारला जातोय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाची हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियन कॅप्टनशी पंगा घेतल्याचं पहायला मिळालं. नेमकं काय झालं? पाहुया...
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या आणि 187 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन मिळाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची कंबर मोडली. मात्र, दुसऱ्या डाव सुरू असताना सामन्यात राडा झाल्याचं पहायला मिळालं. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) यांच्यात शाब्दिक वाद पेटला.
नेमकं काय झालं?
सामन्याची 80 वी ओव्हर सुरू होती. त्यावेळी हरमनप्रीत गोलंदाजीला आली. हरमनप्रीत कौरने टाकलेला बॉल एलिसा हिली हिने डॉट केला. त्यावेळी हरमनप्रीत कौरने हिलीला रन आऊट करण्यासाठी तिच्या दिशेने बॉल फेकला. मात्र, बॉल लागेल म्हणून हिलीने बॅट आडवी केली. त्यावेळी तिच्या बॅटवर बॉल आदळला. हरमनप्रीतच्या या कारनाम्यामुळे हिलीला राग आला. हरमनप्रीतने ऑब्सट्रक्शन द फिल्ड (obstructing the field) नियमानुसार अम्पायरकडे हिली बाद असल्याचे अपील केलं. मात्र, अंपायरने हिलीला नाबाद दिलं. त्यावरून हरमनप्रीत भडकली.
पुढच्याच चेंडूवर हरमनप्रीतने 32 धावांवर खेळणाऱ्या हिलीला एलबीडब्ल्यू करत माघारी पाठवलं. त्यावेळी हरमनप्रीतचा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात हरमनप्रीतने दोन महत्त्वाचे विकेट्स काढून टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.
दरम्यान, भारताच्या एकूण 406 धावा ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. दीप्ती आणि वस्त्राकर यांच्यात आठव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी देखील भारतासाठी एक विक्रम आहे.