IND vs AUS : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! कोणत्याही सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येणार भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाचे सामने
IND W vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट संघ 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध T20 मालिका खेळणार आहे.
IND W vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या घरात 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात पुन्हा एकदा भारतीय संघ मोठ्या व्यासपीठावर दिसणार आहे. तर मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे (Smriti Mandhana) उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) या टी-20 मालिकेचे सामने मोफत पाहायला मिळणार आहेत. हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) महिला संघात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 1 बाद 187 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या महिला संघाने देखील 5 बाद 187 धावा केल्या. त्यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने निश्चित केला गेला. सुपर ओव्हरमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 धावा केलेल्या. याचे प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलिया संघाला 16 धावा करता आल्या आणि भारताच्या महिला संघाने हा सामना 4 धावांनी जिंकला. भारतीयविरूध्द ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाविरुध्द टीम इंडियाचा महिला संघ पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यातील दोन सामने झाले असून दोन्ही संघ एका गुणासहित बरोबरी करत आहेत. याचसोबत हे सामने भारतात खेळवले जात आहेत. हाच सामना तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायचा असेल तर या सामन्यांची तिकिटे मोफत उपलब्ध होत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मालिकेतील पाचही सामने स्टेडियममध्ये विनामुल्य पाहता येणार आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) या घोषणेमुळे महिला क्रिकेटला प्राधान्य मिळेलच यासह चाहत्यांचे मनोरंजनही मोफत होईल आणि अधिकाधिक लोकांना महिला क्रिकेट जवळून पाहता येईल. या मालिकेतील पहिले 3 सामने नवी मुंबईतील डि वाय पाटील स्टेडियमवर खेळवले जातील. तर अखेरचे दोन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत.
वाचा: 'या' खेळाडूंसाठी Team India मध्ये परतीच्या वाटा बंद; रणजी तर गाजवणार का?
सामन्यांची तिकिटे मोफत
महिला क्रिकेट सामने लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पाहावेत यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी-20 मालिकेचे सर्व सामने मोफत ठेवले आहेत. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी मोफत असलेली तिकिटे स्टेडियमच्या विक्री केंद्रावरून घ्यावी लागतील.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
महिला क्रिकेट संघाचे पुढील सामने
14 डिसेंबर - तिसरा टी-२० सामना - ब्रेबॉर्न स्टेडियम
17 डिसेंबर - चौथा टी-२० सामना - ब्रेबॉर्न स्टेडियम
20 डिसेंबर - पाचवा टी-२० सामना - ब्रेबॉर्न स्टेडियम