Smriti Mandhana ICC Ranking: भारतीय महिला क्रिकेटची स्टार फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने इंग्लंडविरुद्ध केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर  ICC Rankingच्या T-20 आणि वन डे रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.(IND W vs ENG W 2रा ODI) T-20त स्मृती मानधना हिने थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर वन डेतही तिने सातव्या स्थानावर उडी मारली आहे.  स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने मिताली राज हिचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डावखुऱ्या स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने अलिकडेच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या T-20 मालिकेत 111 धावा फटकावल्या होत्या. तर पहिल्याच एकदिवसीय सामन्यात तिने 91 धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे तिने T-20त दोन तर वन डेत तीन स्थानांनी पुढे झेप घेतली आहे.


भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट टीम यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी सेंट लॉरेन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय महिला संघाला प्रथम फलंदाजी  करण्यास पाचारण करण्यात आले. भारतीय संघाने 19.1 षटकात 99 धावांपर्यंत आपले तीन विकेट गमावल्या आहेत. गेल्या सामन्यात 91 धावांची शानदार खेळी करणारी स्मृती मानधना यावेळी 40 धावा करुन बाद झाली. तिने 51 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकला. यासह मंधानाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. 


वनडेत सर्वात जलद 3000 धावा  


एकदिवसीय क्रिकेटमध्ये मानधना हिने सर्वात जलद 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने 76 एकदिवसीय डावात 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने माजी कर्णधार मिताली राज हिचा विक्रम मोडला आहे. मितालीने 88 डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करणारी भारताची सलामीवीर मानधना जगातील तिसरी खेळाडू ठरली आहे.ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने 62 डावात आणि मेग लेगिंगने 64 डावात ही कामगिरी केली आहे.