India vs Ireland women, T20 World Cup 2023: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने महिला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आयर्लंडचा डकवर्थ लूईस नियमानुसार (duckworth lewis method) 5 धावांनी पराभव करत टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आहे. आता सेमी फायनचा सामना जिंकून टीम इंडिला वर्ल्ड कपवर नाव कोरते का याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष्य लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा : आयर्लंडच्या खेळाडूने घातलं अनोख हेल्मेट, मैदानात एकच चर्चा


 


टीम इंडियाने (Team India)दिलेल्या 156 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या आयर्लंडची (Ireland women) सुरूवात चांगली झाली नव्हती. कारण सलामीवीर अॅमी हंटर 1 धावा करून आऊट झाली होती. त्यानंतर मैदानात उतरलेली ओरला प्रेडरगास्ट शुन्य धावावर आऊट झाली. गॅबी लेविस आणि लोरा डेलनी आयर्लंडचा डाव सावरला आहे. गॅबी लेविस 32 धावा तर लोराने 17 धावा केल्या आहेत. आयर्लंडने 2 विकेट गमावून 54 धावा केल्या होत्या त्यानंतर सामन्या दरम्यान पाऊस सुरु झाला होता.त्यामुळे सामना थांबवण्यात आला. त्यानंतर डकवर्थ लूईस नियमानुसार सामन्याचा निकाल लागला आहे. डकवर्थ लूईस नियमानुसार (duckworth lewis method) टीम इंडियाने 5 धावांनी आयर्लंडचा पराभव केला आहे. 


156 धावांचे लक्ष्य


टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने (harmanpreet kaur)टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना (smriti mandhana) आणि शेफाली वर्मा सलामीला उतरल्या होत्या. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. शेफाली वर्मा 24 धावावर तर कर्णधार हरमनप्रीत कौर 13 धावा करून आऊट झाली. त्यानंतर मैदानात उरलेली रिचा घोष शुन्य धावावर आऊट झाली. 


 


हे ही वाचा : हार्दिक पंड्या नताशाचे रोमँटिक फोटो आले समोर, पाहा PHOTO


 


एकाबाजूला टीम इंडियाचे एका मागून एक विकेट पडत असताना स्मृतीने (smriti mandhana)एक बाजू भक्कम धरली होती. मंधाना तिच्या नेहमीच्या लयीत खेळत होती.87 धावांपर्यंत तिने मजल मारली होती. संपुर्ण देशवासियांना ती शतक ठोकेल अशी आशा होती, मात्र तिचे शतक हुकले. स्मृतीने 56 बॉलमध्ये 87 धावा ठोकल्या. या खेळीत तिने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. मंधानाच्या विकेट नंतर एका मागून एक विकेट पडतच होते. अखेर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 155 धावा ठोकल्या. नॅशनल क्रश स्मृथी मंधानाच्या (smriti mandhana) 87 धावांच्या बळावर टीम इंडियाला ही धावसंख्या उभारता आली आहे.आता आयर्लंड समोर 156 धावांचे आव्हान असणार आहे. 


दरम्यान पावसामुळे हा सामना अर्धाच झाला त्यामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार निकाल लागला.टीम इंडियाने डकवर्थ लूईस नियमानुसार (duckworth lewis methodआयर्लंडचा 5 धावांनी पराभव करत सेमी फायनल गाठली आहे.