IND vs END : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रिंकू सिंगचं दमदार कमबॅक!
India A vs England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. यात रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय.
India A squad against England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. बीसीसीआयने याची नुकतीच घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीमुळे बीसीसीआयने (BCCI) काही खेळाडूंना संघात कायम ठेवलंय. तर रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय. अफगाणिस्तानविरुद्ध टी-ट्वेंटी सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर आता रिंकू सिंह टेस्ट सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये अभिमन्यू इसवरन टीम इंडियाची जबाबदारी सांभाळणार आहे. साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान यांना संधी देण्यात आलीये. तर सौरभ कुमार याला पहिल्या कसोटीत जागा मिळवता आली. तर तिसऱ्या सामन्यात शम्स मुलानी आणि रिंकू सिंग यांना जागा देण्यात आली आहे.
पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड लायन्सने 553 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला संघ टीम इंडियाचा संघ कोसळला. रजत पाटीदारच्या धमाकेदार 150 वगळता कोणालाही मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. टीम इंडियाला 227 धावाच करता आल्या. मात्र, इंग्लंडने तिसरा डाव 163 वर घोषित केला. त्यानंतर आता टीम इंडियाची परिस्थिती 159 वर 4 ग़डी बाद अशी झालीये. त्यानंतर आता साई सुदर्शन आमि मानव सुतार याच्या कामगिरीवर लक्ष लागलंय. टीम इंडियाला विजयासाठी 331 धावांची गरज आहे.
दुसऱ्या बहु-दिवसीय सामन्यासाठी भारत 'अ' संघ -
अभिमन्यू इसवरन (कर्णधार), साई सुधरसन, रजत पाटीदार, सरफराज खान, टिळक वर्मा, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल.
तिसऱ्या सामन्यासाठी भारत 'अ' संघ -
अभिमन्यू इसवरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, टिळक वर्मा, रिंकू सिंग, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, शम्स मुलानी, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल.