सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारत ३०७ रन्सवर ऑल आऊट झाला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेला २८ रन्सची आघाडी मिळाली आहे. विराट कोहलीच्या १५३ रन्सच्या खेळीमुळे भारताला ही धावसंख्या गाठता आली. विराटनं २१७ बॉल्सच्या या इनिंगमध्ये १५ फोरचा समावेश होता. विराटचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २१वं शतक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेकडून मॉर्नी मॉर्कलनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर केशव महाराज, वर्नन फिलँडर, कागीसो रबाडा आणि एनगीडीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.


दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची अवस्था १८३/५ अशी होती. विराट कोहली ८५ रन्सवर तर हार्दिक पांड्या ११ रन्सवर खेळत होता. पण हार्दिक पांड्या १५ रन्स करून आऊट झाला. पांड्या आऊट झाल्यावर आर. अश्विननं विराटला चांगली साथ दिली. अश्विननं ५४ बॉल्समध्ये ३८ रन्स केल्या.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा