लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं आफ्रिकेला आठ विकेट्सनं हरवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये आता भारताची गाठ पडणार आहे ती बांग्लादेशशी. भारताचा तगडा संघ बघता आता बांग्लादेशला हरवायची औपचारिकताच बाकी आहे. त्यामुळे यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत तत्वत: क्वालिफाय झाल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांग्लादेशनं ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडला हरवलं तर एका मॅचमध्ये पराभवाचा सामना बांग्लादेशला करावा लागला. एक सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे तीन पॉईंट्ससह बांग्लादेश सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झालं आहे.


पहिल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा संघ सोमवारी होणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंकेमधल्या विजेत्या संघाशी खेळेल. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला बांग्लादेशविरुद्ध होईल. भारत आणि बांग्लादेशमधली सेमी फायनल १५ जूनला होणार आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रविवारी १८ जूनला होणार आहे.