चेन्नई : चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये रविवारी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा आमनेसामने आले. ३० वर्षापूर्वी याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला सामना झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना ९ ऑक्टोबर १९८७मध्ये खेळवण्यात आला होता. १९८७च्या वर्ल्डकपमधील तो तिसरा सामना होता.


या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या एका धावेने पराभव सहन करावा लागला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या झालेल्या पराभवाचा बदला ३० वर्षानंतर टीम इंडियाने घेतला. 


१९८७मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली भारतासमोर विजयासाठी २७१ धावांचे आव्हान होते. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव २६९ धावांवर संपुष्टात आला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताला एका धावेने पराभव पत्करावा लागला होता.