VIDEO : ऋषभ पंतने दिला गुलीगत धोका, प्रतिस्पर्ध्यांच्या टीममध्ये घुसखोरी करून केला शुभमनचा गेम
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेमध्ये इंडिया बी कडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने इंडिया ए संघासोबत गोलीगत धोका केलाय. त्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.
India A vs India B : बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 61 धावांची वादळी खेळी केली. ऋषभने केवळ 47 बॉलमध्ये 9 फोर अन् 2 सिक्सच्या मदतीने धावा कोरल्या. त्यामुळे इंडिया बी संघाला तिसऱ्या दिवशी मजबूत आघाडी मिळवला आली. तिसरा दिवस ऋषभने गाजवला अन् चौथ्या दिवसाची सुरूवात देखील त्याने मजेशीर अंदाजात केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होतोय. ऋषभने नेमकं काय केलं? ऋषभ 'स्पाय एजेन्ट' झाला तरी कसा? प्रकरण जाणून घेऊया..
झालं असं की, तिसऱ्या दिवसानंतर सामना रोमांचक स्थिती पोहोचला होता. चौथ्या दिवस निर्णयक असेल, अशी शक्यता होती. अशातच इंडिया ए संघाने मैदानात उतरण्याआधी टीम मिटिंग केली. या इंडिया ए संघाच्या ग्रुप डिस्कशनमध्ये ऋषभ पंत गुपचूप सामील झाला अन् त्याने इंडिया ए संघाची प्लॅनिंग ऐकून घेतली. इंडिया ए संघाची रणनिती त्याने ऐकून घेतल्यानंतर ऋषभ पंत गुपचूप बाहेर पडला. मात्र, आवेश खानच्या नजरेतून ऋषभ वाचू शकला नाही. आवेश खान आणि ऋषभला यांच्यात मजेशीर संभाषण झालं.
पाहा Video :
मुशीर खानचा जलवा :
मुशीर खान याने इंडिया ए विरुद्ध दमदार खेळी करून बीसीसीआयचे दरवाजे खटखटवले आहेत. तर त्याने या सामन्यात क्रिकेटच्या देवाचा म्हणजे सचिन तेंडूलकरचा देखील रेकॉर्ड मोडलाय. दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात मुशीरने तिसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. तर गोलंदाजीमध्ये आकाश दीप याने भेदक गोलंदाजी करत टीम इंडियाचे दरवाजे खटखटवले आहे.
हेही वाचा : या भारतीयांनी भोगलाय तुरुंगवास! कोणावर हत्येचा गुन्हा तर कोणावर....
इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान आणि खलील अहमद.
इंडिया बी प्लेइंग ईलेव्हन: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि यश दयाल.