Virat Kohli म्हणतो `अॅडिलेडचं मैदान माझ्यावर मेहरबान, जेव्हा मी मैदानात येतो तेव्हा...`
India beat Bangladesh : टीम इंडियाचा हा वर्ल्डकपच्या स्पर्धेतील तिसरा विजय होता. त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच राहिलेल्या विराटने मोठं वक्तव्य केलंय.
India vs Bangladesh, T20 World Cup match: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव केलाय. पावसाचा व्यत्यत आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करत सामना फिरवला. या सामन्यात बांग्लादेशचा 5 रन्सने पराभव (India beat Bangladesh by 5 runs) केला. टीम इंडियाचा हा वर्ल्डकपच्या स्पर्धेतील तिसरा विजय होता. त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच राहिलेल्या विराटने मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला विराट?
सामना खुप जवळ गेला. आम्हाला अशी अपेक्षा देखील नव्हती. फलंदाजीच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा राहिलाय. आत गेल्यावर थोडं दडपण होतं. मला सहज वृत्तीने छोट्या चुका रोखायच्या होत्या. आजच्या सामन्यानंतर आम्ही सर्व आनंदी आहोत. मला त्याची भूतकाळाशी तुलना करायची नाही, असं विराट कोहली म्हणाला आहे.
वर्ल्ड कप (T20WC2022) ऑस्ट्रेलियात आहे हे कळताच मी तयारी पुर्ण केली. चांगले क्रिकेटचे शॉट्स महत्त्वाचे असतील, हे मला माहिती होतं. मला या मैदानावर खेळण्यास मजा येते. मला हे अॅडिलेडचं मैदान माझ्या होम ग्राऊंडसारखं वाटतं, असं विराट म्हणाला आहे. जेव्हा मी अॅडलेडला येतो तेव्हा मी माझा आनंद घेत असतो आणि फलंदाजी करत असतो, असंही त्याने यावेळी म्हटलं आहे.
आणखी वाचा - Virat Kohli : नेमकी चूक कोणाची ? विराटची की डीकेची? Video पाहून तुम्हीच सांगा!
दरम्यान, टीम इंडियाकडून विराट कोहलीने (Virat Kohli) एकाकी झुंज दिली आहे. विराटने 44 बॉलमध्ये 64 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 फोर आणि 1 सिक्स खेचला. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. कोहलीच्या या विराट पारीमुळे तो पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.