लंडन : जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारतीय संघाने कॅनडावर ३-० असा दमदार विजय मिळवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून एस सुनीलने पाचव्या मिनिटाला, आकाशदीप सिंहने १०व्या मिनिटाला आणि सरदार सिंहने १८व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर भारताने हा विजय मिळवलाय.


या विजयासोबतच भारताने या स्पर्धेतील क्वार्टरफायनलमध्ये जागा मिळवलीये. भारताने गुरुवारी स्कॉटलंडवर ४-१ असा विजय मिळवलाय. त्यानंतर कॅनडाचा ३-० असा पराभव केला. आज भारताची लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.