लंडन : भारताच्या हॉकी संघाने जागतिक हॉकी लीग(उपांत्य फेरीचा टप्पा) पाकिस्तानला पुन्हा पराभवाची धूळ चारलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचव्या ते आठव्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६-१ ने अशी दमदार विजय मिळवलाय. 


सामन्यात भारताची सुरुवात दमदार झाली. पहिल्या ८व्या मिनिटालाच रमणदीप सिंगने गोल करत खाते खोलले. त्यानंतर २५व्या मिनिटाला तलविंदर सिंग, २७व्या मिनिटाला मनदीप सिंग, २८व्या मिनिटाला पुन्हा रमणदीप सिंग, ३६व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल करत पाकिस्तानविरुद्यद ५-० अशी दिमाखदार आघाडी घेतली. 


४१व्या मिनिटाला पाकिस्तानच्या अहमद एजाजला पहिला गोल करण्यात यश मिळाले. त्यानंतर ५९व्या मिनिटाला मनदीप सिंगने आणखी एक गोल करताना पाकिस्तानविरुद्ध ६-१ असा विजय मिळवलाय. या स्पर्धेतील भारताकडून पाकिस्तानला हा दुसरा पराभव आहे.