मुंबई : 2022 च्या  कॉमनवेल्थ गेम्सध्ये भारताला चौथं पदक मिळालं आहे. बिंदियारानी देवीने महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या 55 ​​किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकलंय. बिंदियारानीने स्नॅचमध्ये 86, तर क्लीन अँड जर्कमध्ये 116 स्कोर केला. म्हणजेच तिने एकूण 202 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर बिंदियारानी देवी खूप आनंदी दिसत होती. ती म्हणाली, मी पहिल्यांदा कॉमनवेल्थमध्ये खेळले आणि रौप्यपदक जिंकून मला खूप आनंद झाला. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी होता. मात्र, माझ्या हातातून गोल्ड मेडल निसटलं. पुढच्या वेळी आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करेन.


कॉमनवेल्थ 2022 मध्ये भारताला आतापर्यंत चारही पदकं वेटलिफ्टर्सनी पटकावून दिली आहेत. जिथे टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलंय. दुसरीकडे संकेत महादेव आणि गुरुराजा पुजारी यांनी रौप्य आणि कांस्यपदक पटकावलं आहे. 



बिंदियाराणीचा प्रवास


मणिपूरची बिंदियाराणी देवी भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) केंद्रात प्रशिक्षण घेते. पण कोरोना महामारीमुळे हे केंद्र बंद असताना बिंदियाराणीने स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या प्रशिक्षक असलेल्या अनिता चानू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलंय.


बिंदियारानी देवीने पेनांग, मलेशियामध्ये झालेल्या 2016 वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि 10 व्या स्थानावर राहिली. 23 वर्षीय बिंदियारानी देवीने 2019 साली झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.