Ind Vs Eng: पाचव्या कसोटीतील पराभवानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, `कर्णधारपद...`
जसप्रीत बुमराहने या मालिकेत 23 गडी बाद केले. या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
India Vs Englan 5th Test: पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 7 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर 5 सामन्यांची मालिक 2-2 ने बरोबरीत सोडवण्यात यश मिळालं आहे. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 3 गडी गमवत पूर्ण केलं. 15 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचं भारताचं स्वप्न अपूर्ण राहिलं. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी भारताच्या हाताशी असलेला विजय हिसकावून घेतला.
" इंग्लंडने चांगली लढत दिली आणि दुसऱ्या डावात आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. दोन्ही संघांनी चांगले क्रिकेट खेळले. ऋषभने संधी साधली, त्याने आणि जडेजाने जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण आम्हाला यश मिळालं नाही. कर्णधारपद भूषवणं हे एक चांगलं आव्हान होते, खूप काही शिकायला मिळालं. संघाचे नेतृत्व करणं हा माझा सन्मान आणि खूप मोठा अनुभव होता." असं कर्णधार जसप्रीत बुमराह याने सांगितलं. जसप्रीत बुमराहने या मालिकेत 23 गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
जो रुटने 82 च्या स्ट्राईक रेटने 28 वं शतक पूर्ण केलं. तर जॉनीने 78 च्या स्ट्राईक रेटने 115 धावा कुटल्या. विशेष म्हणजे जॉनीचं हे सलग चौथं आणि कारकिर्दीतील 12 वं कसोटी शतक ठरलं. या दोघांनी चौथ्या डावात नाबाद 269 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील चौथ्या ते त्याखालच्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी ठरली.