मुंबई : २०१९-२० सालच्या टीम इंडियाच्या घरच्या वेळापत्रकाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. बांगलादेशची टीम पहिल्यांदाच भारतात सीरिज खेळण्यासाठी येणार आहे. नोव्हेंबरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ टी-२० आणि २ टेस्ट मॅचची सीरिज होईल. बीसीसीआयने घोषित केलेल्या या वेळापत्रकात टीम इंडिया घरच्या मैदानात ५ टेस्ट, ९ वनडे आणि १२ टी-२० मॅच खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ टेस्ट आणि बांगलादेशविरुद्धच्या २ टेस्ट या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असणार आहे. या वर्षापासून आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


टीम इंडियाचा यावेळचा घरचा मोसम दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजपासून सुरु होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया ३ टी-२० आणि ३ टेस्ट खेळणार आहे. १५ सप्टेंबरपासून या सीरिजला सुरुवात होईल.


टीम इंडिया यंदाच्या मोसमात वनडे, टी-२० आणि टेस्ट अशा संपूर्ण सीरिज खेळणार नाही. यामुळे मार्च २०२० साली दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा ३ वनडे मॅचची सीरिज खेळण्यासाठी भारतात येईल.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० आणि टेस्ट सीरिज संपल्यावर बांगलादेश भारतात येईल. बांगलादेशचा हा पहिलाच संपूर्ण भारत दौरा असेल. याआधी २०१७ साली बांगलादेशने भारतात टीम इंडियाविरुद्ध हैदराबादमध्ये फक्त १ टेस्ट खेळली होती.


बांगलादेशच्या सीरिजनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध आणि मग झिम्बाब्वेविरुद्ध सीरिज खेळेल. यानंतर ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.


टीम इंडियाचं घरचं वेळापत्रक 


फ्रीडम ट्रॉफी-२०१९- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 


पहिली टी-२०- १५ सप्टेंबर- धर्मशाळा 


दुसरी टी-२०- १८ सप्टेंबर- मोहाली 


तिसरी टी-२०- २२ सप्टेंबर- बंगळुरू 


पहिली टेस्ट- २-६ ऑक्टोबर- विशाखापट्टणम


दुसरी टेस्ट- १०-१४ ऑक्टोबर- रांची 


तिसरी टेस्ट- १९-२३ ऑक्टोबर- पुणे


बांगलादेशचा भारत दौरा २०१९


पहिली टी-२०- ३ नोव्हेंबर- दिल्ली 


दुसरी टी-२०- ७ नोव्हेंबर- राजकोट 


तिसरी टी-२०- १० नोव्हेंबर- नागपूर 


पहिली टेस्ट- १४-१८ नोव्हेंबर- इंदूर


दुसरी टेस्ट- २२-२६ नोव्हेंबर- कोलकाता


वेस्ट इंडिजचा भारत दौरा २०१९


पहिली टी-२०- ६ डिसेंबर- मुंबई 


दुसरी टी-२०- ८ डिसेंबर- तिरुवनंतपुरम 


तिसरी टी-२०- ११ डिसेंबर- हैदराबाद


पहिली वनडे- १५ डिसेंबर- चेन्नई


दुसरी वनडे- १८ डिसेंबर- विशाखापट्टणम


तिसरी वनडे- २२ डिसेंबर- कटक


झिम्बाब्वेचा भारत दौरा २०२०


पहिली टी-२०- ५ जानेवारी- गुवाहाटी 


दुसरी टी-२०- ७ जानेवारी- इंदूर 


तिसरी टी-२०- १० जानेवारी- पुणे 


ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा २०२० 


पहिली वनडे- १४ जानेवारी- मुंबई


दुसरी वनडे- १७ जानेवारी- राजकोट 


तिसरी वनडे- १९ जानेवारी- बंगळुरू