...आणि भारताचं विश्वविक्रमाचं स्वप्न भंगलं!
भारतीय संघ जुलै २०१७ पासून एकदाही टी-२० मालिकेत पराभूत झालेला नाही.
हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा अवघ्या ४ धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान दिले होते. पण भारताला २०८ धावाच करता आल्या. विराट कोहलीला बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या एकदिवसीय सामन्यांसाठी तसेच टी-२० मालिकेसाठी आराम दिला होता. त्यामुळे कर्णधार पदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पाकिस्तान संघाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती. पण सीरिज गमावल्यामुळे भारताला तो विक्रम मोडीत काढता आला नाही.
पाकिस्तानचा विक्रम
पाकिस्तानने लागोपाठ ११ टी-२० मालिका विजय मिळवण्याची कामगिरी केली आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत पराभव झाल्याने पाकिस्तानच्या विक्रमाला दक्षिण आफ्रिकेने रोखले.
भारतीय संघ जुलै २०१७ पासून एकदाही टी-२० मालिकेत पराभूत झालेला नाही. जुलै २०१७ साली वेस्टइंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला होता. यानंतर लागोपाठ १० टी-२० सीरिजमध्ये प्रतिस्पर्धी टीमला भारताला हरवता आलं नाही. जुलै २०१७ पासून भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आयर्लंड आणि वेस्टइंडिज या संघाविरुद्ध टी-२० मालिका खेळल्या. या मालिकेत भारतीय संघानी प्रतिस्पर्धी संघाचा मालिकेच पराभव केला तर काही मालिका या बरोबरीत सुटल्या. परंतू भारतीय संघाने कोणत्याही संघाकडून मालिका पराभव स्वीकारला नव्हता.
भारतीय संघाने जर का नुकत्याच न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवला असता किंवा ही मालिका बरोबरीत सोडवली असती तर भारताला पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी संयुक्तरित्या बरोबरी साधता आली असती. याचबरोबर भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा याचाही हा पहिलाच मालिका पराभव आहे.