मुंबई : दिव्यांगांच्या वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला भारतीय संघानं गवसणी घातली आहे. अंतिम फेरीत भारतानं यजमान इंग्लंडला ३६ रननी धुळ चारत विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट संघटनेनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहा देशांनी सहभाग घेतला होता. नाणेफेक जिंकत प्रथम बॅटिंगला आलेल्या भारतीय टीमने २० ओव्हरमध्ये १८० रन केल्या. इंग्लंडला हे आव्हान काही पार करता आलं नाही आणि भारतानं विजेतेपदावर नाव कोरलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून मधल्या फळीतील बॅट्समन आर.जी. सांटेने ३४ बॉलमध्ये ५३ रन केले. ओपनर केडी फणसेने ३६ आणि विक्रांत केणीने २९ रन, तसंच एस. महेंद्रनने ३३ रनची खेळी केली.



भारताकडून मिळालेल्या १८१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडला २० ओव्हरमध्ये १४४ रनच करता आल्या. बीसीसीआयने भारतीय टीमच्या या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट बीसीसीआयने केलं आहे.