मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना जिंकणं टीम इंडियासाठी जेवढं महत्त्वपूर्ण आहे कारण जर टीम इंडियाला या सामन्यात विजय मिळाला, तर तो आयसीसीच्या एकदिवसीय रॅकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचणार आहे.


चेन्नई वनडे जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारत सध्या 118 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर भारतीय संघाने दुसरा एकदिवसीय सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेचा संघाला मागे टाकते भारत पहिल्या स्थानावर जाईल.


जर टीम इंडिया हा सामना हरते तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर येईल आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर जाईल. सध्या कांगारू संघ आयसीसीच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे 116 गुण आहेत. दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे 117 गुण होतील. तरी ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर जाईल.