मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुसऱ्या T-20 सामन्यात न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली संघात संधी मिळणाऱ्या सर्व युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण यादरम्यान भारताला एक गोलंदाजही मिळाला आहे जो आगामी काळात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारखे नाव कमवू शकतो. (India vs New zealand T20 series)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी


हर्षल पटेलला (Harshal Patel) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पदार्पणाची संधी देण्यात आली. आयपीएल 2021 मध्येच हा गोलंदाज किती धोकादायक आहे हे सर्वांनी पाहिले होते. मात्र या गोलंदाजाने टीम इंडियासाठी येताच वादळ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. होय, हर्षलला त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीराचा किताब देण्यात आला. हर्षलने 4 षटकात केवळ 25 धावा देत 2 बळी घेतले. बाकीचे वेगवान गोलंदाज धावा लुटत असताना हर्षलने येताच सामन्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. (Harshal patel win the Hearts)


आयपीएलमध्येही अप्रतिम कामगिरी


हर्षल पटेल हा आयपीएल 2021 चा सर्वोत्कृष्ट गोलंदाज होता. आरसीबीच्या या गोलंदाजासमोर जगातील मोठे फलंदाज पाणी भरताना दिसले. हर्षल आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता आणि त्याने पर्पल कॅपही पटकावली. त्याने आयपीएल 2021 मध्ये एकूण 32 विकेट घेतल्या आणि तो एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. या विक्रमासाठी त्याने ड्वेन ब्राव्होची बरोबरी केली. याशिवाय IPL 2021 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा हर्षल हा एकमेव गोलंदाज होता. हा गोलंदाज आगामी काळात टीम इंडियाचा सर्वात घातक गोलंदाज म्हणूनही उदयास येऊ शकतो. (Harshal patel in IPL)


जगातील कोणताही वेगवान गोलंदाज त्याच्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना त्रास देतो. पण हर्षल हा वेगवान गोलंदाज असल्याने त्याच्या संथ चेंडूंनी सर्वांचीच नाकी नऊ आणतो. हर्षलचे संथ चेंडूंवरचे नियंत्रण अप्रतिम आहे आणि शेवटच्या षटकांतही तो विकेट्स घेण्यास यशस्वी ठरतो. काल न्यूझीलंडविरुद्धही हर्षलने दाखवून दिले की तो येणाऱ्या काळात घातक गोलंदाजां पेक्षा कमी नाही.


भारताने मालिका जिंकली


टीम इंडियाने भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेतील दुसरा सामना जिंकला. रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी पाहायला मिळाली, त्यामुळे किवी संघाचा 7 विकेटने पराभव झाला. भारताच्या दोन सलामीवीरांमध्ये 117 धावांची भागीदारी झाली, केएल राहुलने 132.65 च्या स्ट्राइक रेटने 49 चेंडूत 65 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने 152.77 च्या स्ट्राईक रेटने 36 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. (Team india win T20 Series against New zealand)