टीम इंडियाचा भीमपराक्रम, जगात असा विक्रम कोणालाच जमला नाही
भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे
हरिश मालुसरे, झी मीडिया, Sport News : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये (INDvsSa T20 Match) विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाने 3 विकेट्स आणि 25 बॉल राखून विजय नोंदवला आहे. टीम इंडियाने या विजयासह मोठा विश्वविक्रम रचला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. (India has achieved 300 victories in ODI cricket Sport Marathi News)
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा भारत पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 विजय साकारले आहेत. भारतानंतर ऑस्ट्रेलियाने 257 विजयांसह सर्वाधिक विजय मिळवले आहेत. या यादीमध्ये भारताच्या जवळपासही कोणीच नाही. भारताने आजच्या विजयासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजयांचं त्रिशतक केलं आहे.
दक्षिण आफ्रिकने (south africa) दिलेल्या 279 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची (team india) सुरुवात चांगली झाली नव्हती. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) ओपनिंगला उतरले होते. मात्र दोघेही टीम इंडियाला (team India) चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. त्यानंतर उतरलेल्या श्रेयस अय्यर (shreyas iyer) आणि ईशान किशनने (ishan kishan) डाव सावरला.
ईशान किशनने तुफान फलंदाजी करत टीम इंडियाची वाटचाल विजयाच्या दिशेने नेली. मात्र तो सेंच्युरी मारण्यापासून हूकला. तो 84 बॉलमध्ये 93 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 4 फोर आणि 7 सिक्स मारले.यानंतर मैदानात असलेल्या श्रेयस अय्यरने सामन्याची एक बाजू शेवटपर्यंत कसून धरली होती. टीम इंडियाने (team india) मिळवलेल्या या मोठ्या विजयाने मालिका 1-1 ने बरोबरीत आली आहे. आता तिसरा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे.