T-20 नंतर रोहित शर्मा, विराट कोहली कसोटीमधूनही निवृत्त? मेलबर्नमधल्या दारुण पराभवानंतर...
Rohit Sharma Virat Kohli Retirement? भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानामध्ये मालिका गमावल्यानंतर आता बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतही निराशाजनक कामगिरी केली आहे.
Rohit Sharma Virat Kohli Retirement? 'करो या मरो'च्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने ऐनवेळी कच खाल्ली आणि बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमधील मेलबर्न कसोटी तब्बल 184 धावांनी गमावली. या पराभवाबरोबर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. भारताचा हा पराभव फारच मोठा असून आता जिंकण्याच्या टक्केवारीमध्ये भारताला अव्वल दोन संघांमध्ये स्थान राखणं जवळपास अशक्य मानलं जात आहे. भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील वरिष्ठ फलंदाज विराट कोहली यांचं कसोटीमधील करिअर संपुष्टात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
अजित आगरकर ऑस्ट्रेलियात
रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या संपूर्ण कसोटी मालिकेमध्ये चमक दाखवता आलेली नाही. भारताने या मालिकेत जिंकलेला एकमेव सामनाही रोहित शर्मा गैरहजर असल्याने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आला होता तेव्हाच जिंकला आहे. त्यामुळेच आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियन दौरा हा त्यांच्या करिअरमधील शेवटचा दौरा असल्याची जोरदार चर्चा आहे. रोहितबरोबर बोलण्यासाठी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आधीच ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचले आहेत.
दोघांनाही नारळ द्या
भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु असून आता रोहित आणि विराटला नारळ द्यावा अशी मागणी केली जात आहे. सोशल मीडियावरील मोजक्या प्रतिक्रिया पाहूयात...
1) रोहित आणि विराटच्या सेवेसाठी त्यांचे आभार
2) निवृत्तीच्या शुभेच्छा...
3) कोणी निवृत्त व्हावं?
4) या दोघांचं काय गंडत आहे?
5) निवृत्तीच्या शुभेच्छा...
भारताची या मालिकेतील शेवटची कसोटी सिडनीच्या मैदानावर 3 ते 7 जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे.