Sport News :  भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये  भारताचा 9 धावांनी पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 250 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 240 धावा करत आल्या. भारताकडून संजू सॅमसनेने नाबाद 86 धावांची खेळी केली. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने भारतीय संघाचा पराभव झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवनने  नाणेफेक जिंंकत बॉलिंगचा निर्णय घेतला होता. सलामीवीर जानेमन मलान आणि क्विंटन डी कॉक यांनी 49 धावांची सलामी दिली. मलान बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाही बाद झाला त्यापाठोपाठ ऐडन माक्रमलाही कुलदीप यादवने शून्यावर बाद केलं. डिकॉक 48 धावा बाद झाल्यानंतर क्लासेन आणि मिलर यांनी 134 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर आफ्रिकेने भारतीय संघाला 250 धावांचं लक्ष्य होतं. 


भारतीय संघाचीही सुरूवात खराब झाली, शिखर धवन आणि शुभमन गिल यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. श्रेयस अय्यर 50 धावांवर बाद झाला. सामना हातातून निसटला असं वाटत होतं त्यावेळी शार्दुल ठाकूरने 5 चौकार लगावले आणि भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर शार्दुलही बाद झाला आणि भारताच्या विकेट्स जात राहिल्या. अखेरच्या षटकामध्ये संजूने पूरेपूर प्रयत्न केले मात्र भारताचा 9 धावांनी विजय झाला. दक्षिण आफ्रिकेने विजयी सलामी दिली आहे.