नवी दिल्ली :  क्रिकेट फॅन्ससाठी बॅड न्यूज.. या संदर्भात अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण असे समजते की पाकिस्तानमुळे भारतात होणारा एशिया कप धोक्यात आला आहे. 


संबंधामुळे संधी गमावणार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संदर्भात बीसीसीआयकडून एशिया कपचे यजमान पद निसटू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्या द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. दहशतवाद्याच्या विरोधात पाकिस्तानचा सॉफ्ट कॉर्नर यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. या कारणाने दोन्ही देशात बराच काळापासून एकही सिरीज झालेली नाही. 


इतर ठिकाणी खेळातात..


भारत पाकिस्तानशी एखाद्या न्यूट्रल मैदानावर एखादी मॅच खेळत आहे. त्यामुळे भारतात होणाऱ्या एशिया कपवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. 


अंडर १९ एशिया कप नाही झाला...


२०१८ मध्ये भारतात एशिया कप होणार आहे.  पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्याची परवानगी नाही.  एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार या तणावाच्या परिस्थिती पाकिस्तानची अंडर १९ टीमही भारतात आलेली नाही. त्यामुळे सिनिअर टीमबद्दल विचारही करू शकत नाही. 


मलेशियात हलविली स्पर्धा... 


नोव्हेंबर २०१७ मध्ये अंडर १९ एशिया कप भारतात होणार होता. पण सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्याची परवानगी नाकारली त्यामुळे ही स्पर्धा मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये घेण्यात आली.