Tokyo Olympics 2021 : मनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारतीय पुरुष हॉकी टीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये नॉक आऊट एंट्री केली आहे. ग्रुप ए च्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने जपानच्या संघाला पराभूत केलं आहे. भारताने आपला ग्रुप लीगचा शेवटचा सामना जिंकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रुपच्या अखेरच्या सामन्यात भारताने जपानला 5-3 च्या फरकाने पराभूत केले. 12 व्या मिनिटाला भारताने हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरुन गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर 17 व्या मिनिटाला भारताने दुसरा गोल केला.


यानंतर 19 व्या मिनिटाला जपानसाठी केंटा टनाकाने जपानसाठी पहिला गोल केला. भारताने हाफ टाइमपर्यंत जपानवर 2-1 अशी आघाडी कायम राखली. जपानने 31 व्या मिनिटाला गोल करून भारताची बरोबरी केली, पण थोड्याच वेळात भारताने पुन्हा एकदा आघाडी घेतली. शमशेरने भारतासाठी तिसरा गोल केला.


यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने चौथा गोल केला. 51 व्या मिनिटाला नीलकंठने सुरेंद्रच्या मदतीने दुसरा गोल केला. यानंतर, शेवटच्या क्षणी, गुरजीतने भारतासाठी 5 वा गोल केला आणि हा सामना जवळजवळ एकतर्फी केला. मात्र, यानंतर जपानने आणखी एक गोल केला.


ग्रुपच्या दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय हॉकी संघाचा 5-1 अशा फरकाने पराभव केला. होता न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासह भारताने त्यांच्या मोहिमेची सुरूवात केली. भारताने ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि विजयाची हॅटट्रिक केली.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर भारताने प्रथम स्पेनला 3-0 आणि अर्जेंटिनाला 3-1 ने पराभूत करून आपले स्थान निश्चित केले. आता अंतिम सामन्यात जबरदस्त विजयासह भारताने अ गटात दुसऱ्या स्थानावर आपले स्थान पक्के केले आहे.


क्वार्टर फायनलमध्ये भारताला कोण आव्हान देणार?


उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना ब गटातील तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. गट ‘बी’ मध्ये बेल्जियम अव्वल स्थानी आहे. त्यानंतर जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि नेदरलँड्स यांच्यात कांटे की टक्कर आहे. अंतिम सामन्याच्या निर्णया नंतरच भारताचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे.