मुंबई : भारतीय टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला तर वनडे सीरिजमध्ये १-२नं पराभव झाला. आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाताल भारताचा हा इंग्लंड दौरा अजूनपर्यंत संमिश्र राहिला आहे. आता टेस्ट क्रिकेटमध्ये भारताची खरी परीक्षा आहे. विराटच्या नेतृत्वात भारतानं आत्तापर्यंत ३९ मॅच खेळल्या आहेत. यामध्ये भारताचा ३९ मॅचमध्ये विजय आणि १२ मॅचमध्ये पराभव झाला. तर १ मॅच अनिर्णीत राहिली. पण भारतीय टीममध्ये याआधी असेही कर्णधार होते ज्यांच्या नेतृत्वात भारत एकही सामना हारला नाही.


गौतम गंभीर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरच्या नेतृत्वात भारतानं ६ वनडे मॅच खेळल्या. यातल्या सगळ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. गंभीर २०१० साली न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पहिल्यांदा कर्णधार झाला. ही सीरिज भारतानं ५-०नं जिंकली. धोनी, तेंडुलकर, सेहवाग, हरभजन आणि जहीर खान यावेळी भारतीय टीममध्ये नव्हते. गौतम गंभीरनं या सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी केली. या सीरिजमध्ये गंभीरनं २ शतकांसह ३२९ रन केले होते.


अजिंक्य रहाणे


अजिंक्य रहाणेनं ३ मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं. या तिन्ही मॅचमध्ये भारताचा विजय झाला. नुकत्याच अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये रहाणे टीमचा कर्णधार होता. या टेस्टमध्ये भारताला विजय मिळाला होता.